गुणवंत विद्यार्थ्यांचा सावंतवाडीत पार पडला सत्कार

आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समितीचे आयोजन;प्रकाश राठोड यांनी केले मार्गदर्शन

⚡सावंतवाडी ता.०३-: बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समितीच्या वतीने आज रविवार दिनांक 3 जुलै रोजी 10 वी आणि 12 वी तसेच पदवी आणि स्कॉलरशिप परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी 10 वी, 12 वी नंतरच्या संधी व स्पर्धा परीक्षा या विषयावर प्रकाश राठोड यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी रामचंद्र जाधव, सगुण जाधव, समितीचे अध्यक्ष कांता जाधव, उपाध्यक्ष दिलीप इन्सुलकर, सहसचिव महेंद्र सावंत, कोषाध्यक्ष सुनील जाधव, सचिव जयराम जाधव आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page