जीवनात मार्गदर्शन चांगले भेटले तर आयुष्याची वाटचाल सुखकर होते…

प्रा. आर एन काटकर यांचे प्रतिपादन…

मालवण दि प्रतिनिधी
जिवनाच्या वाटचालीत चांगल्या मार्गदर्शनाबरोबरच चांगल्या मार्गदर्शकाचे फार मोठे स्थान असून जीवनात मार्गदर्शक चांगले भेटले तर आपल्या आयुष्याची वाटचाल सुखकर बनते. सुदैवाने मला माझ्या जीवनाच्या प्रवासात भेटलेल्या माणसांनी मला गुण दोषासह स्विकारत जे बहुमोल मार्गदर्शन केले ते आयुष्याच्या जडणघडणीत उपयुक्त ठरले असे प्रतिपादन मालवण येथील स. का. पाटील. सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रा. आर. एन. काटकर यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथे कोकण जिओग्राफी असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने प्रा. डॉ. आर.एन. काटकर सरांचा सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा संपन्न झाला त्यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा डॉ काटकर हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. एस. ए. ठाकूर, सौ. काटकर, प्रा. डॉ. आर. बी. पाटील, प्रा. डॉ. एस. एन. पाटील हे उपस्थित होते.

यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा. काटकर म्हणाले, कोकण जिओग्राफी असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था नसून ते एक कुटुंब आहे. यातले पदाधिकारी हे कारभारी आहेत या संस्थेने म्हणा अथवा या संस्थेच्या कारभाऱ्याने जे प्रेम दिले ते प्रेम मी कदापी विसरू शकत नाही. मी पश्चिम महाराष्ट्रातला माणूस नोकरीच्या निमित्ताने मालवणी मुलखात येतो आणि या भागातील मालवणी माणस त्याला आपले मानून आपल्यात सामावून घेतात. मालवणी माणसाचे हे प्रेम आपण विसरू शकत नाही. आणि या मालवण वासीयांच्या प्रेमातून आपण उतराई होऊ इश्चित नाही. मालवण वासीयांच्या ऋणात राहणेच मी पसंद करीन असेही ते म्हणाले.
यावेळी संचालक प्रा. डॉ. सुधीर बुवा, प्रा. हनुमंतराव यादव, प्रा. डॉ. तेजस जयकर, ऍड. जयबा धुरी, प्रा. विजय रासम, डॉ. सुमेधा धुरी, यावेळी उपस्थित होते.

यावेळी प्रा. सुधीर बुवा, प्रा. डॉ. सुमेधा धुरी, प्रा. विजय रासम यांनी काटकर सरांसोबतचे काही किस्से सांगितले तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रा. डॉ. आर. बी. पाटील यांनी मानले.

You cannot copy content of this page