बहुमत चाचणीआधी शिवसेनेला मोठा धक्का,

सेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात सामील

⚡मुंबई दि.०४-: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला बहुमत चाचणीच्या आधी मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. संतोष बांगर हे काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेसोबत होते. शिवसेनेच्या सुनील प्रभू यांचा व्हीप मानत संतोष बांगर यांनी काल शिवसेनेच्या बाजून मतदान सुद्धा केलं होतं. मात्र आज त्यांनी बदलेल्या भूमिकेमुळे अनेकांना धक्का बसला आहे.

संतोष बांगर आज ताज प्रेसिडन्सीमध्ये उपस्थित झालेले पाहायला मिळाले. संतोष बांगर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पाहून अनेकांच्या भुवया उंचवल्या. त्यानंतर संतोष बांगर हे शिंदे गटातील आमदारांसोबत बस मधून विधानभवनात रवाना झाले आहे. संतोष बांगर यांच्या बंडखोरीमुळे आता शिंदे गटातील शिवसेनेच्या आमदारांची संख्या आता 40 वर पोहोचली आहे. तर शिवसेने सोबतच्या आमदारांची संख्या आता 15 वर आली आहे.

You cannot copy content of this page