हिमाचल प्रदेशात खासगी बस दरीत कोसळली,

शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू

⚡शिमल दि.०४-: हिमाचल प्रदेशातील कुलू जिल्ह्यात आज सकाळी भीषण अपघात झाला. सकाळीच प्रवाशांना घेऊन निघालेली एक खासगी बस दरीत कोसळली. यात शाळकरी मुलांचाही समावेश होता. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेत,शाळकरी मुलांसह जवळपास 16 जणांचा मृत्यू झाला.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून अजूनही काही अपघात ग्रस्तांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी स्थानिक प्रशासकीय कर्मचारी , अधिकारी आणि पोलिसांचे बचावकार्य सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह अनेक नेत्यांनी या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांप्रती सहानूभूती व्यक्त केली आहे. तसेच जखमींना तातडीने उपचार मिळण्यासंबंधी सूचना केल्या आहेत.

You cannot copy content of this page