जानवली पुलानजीकच्या पिकअप
शेडमध्ये युवकाची आत्महत्या

⚡कणकवली ता.०४-: मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली येथील जानवली पुलानजीक मुंबईच्या दिशेने जाणार्‍या सर्व्हिस रोडवरील एस टी पिक अप शेडमध्ये युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी 8 वा. सुमारास उघडकीस आली.

युवक पिकअप शेडच्या खिडकीला गळफास घेऊन लटकत असल्याचे पाहून एका नागरिकाने पोलिसांशी संपर्क साधला.पण त्या खिडकीची उंची कमी असल्याने त्याने आत्महत्या कशी केली या संदर्भात तर्क वितर्क निगत आहेत.

घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक राजेंद्र हूलावळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. यावेळी डी वाय एस पी विनोद कांबळे यांनी देखील घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या युवकाच्या अंगावर पांढरे टीशर्ट व बरमोडा आहे. त्याचे वय अंदाजे 35 वर्षे आहे. सकाळी 9.45 वाजेपर्यंत त्याची ओळख पटली नव्हती.

You cannot copy content of this page