दांडेली पूल पाण्याखाली

सावंतवाडी दांडेली आरोस मार्गावरील वाहतूक खोळंबली

⚡बांदा ता.०४-:
दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा सोमवारी पहाटे दमदार एंट्री केली. सावंतवाडी-दांडेली-आरोस मार्गावरील दांडेली पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही बाजूने वाहतूक खोळंबली. दुपारी बारा वाजेपर्यंत पाण्याचा ओघ वाढतच होता.

मान्सूनपूर्व पाऊस चांगला पडत असताना आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. दांडेली पुलाची उंची कमी असल्याने हलका जरी पाऊस झाला तरी वाहतुकीस पाण्याचा धोका निर्माण होतो. पुलाची उंची वाढविण्याची मागणी वारंवार प्रशासनाकडे करुन देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने नैसर्गिक परिस्थितीस ग्रामस्थांना सामोरे जावे लागत असल्याचा रोष उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला. तर दुपारी बारा वाजेपर्यंत पाण्याचे प्रमाण तसेच होते.

You cannot copy content of this page