Headlines

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे हिंदी राष्ट्रीय परीक्षेत नेत्रदीपक यश…

⚡कुडाळ ता.२४-: येथील बॅ.नाथ.पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्थान आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हिंदी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेतील कु वेदांत वैभव पालव (इयत्ता तिसरी) व कु वेदांत विठोबा सावंत (इयत्ता नववी) या दोन विद्यार्थ्यांना महात्मा गांधी राजभाषा प्रतिभावंत पुरस्कार मिळाला. तसेच ६८ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून शाळेच्या…

Read Full News

शहर विकास आराखड्याबाबत लवकरच विशेष सभा…

कुडाळ नगर पंचायत सर्वसाधारण सभा संपन्न.. ⚡कुडाळ ता.२४-:शहर विकास आराखड्याबाबत लोकांच्या अनेक समस्या आहेत. नेमकी माहीतीच समजत नसल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण होत असून प्रशासनाकडून सविस्तर माहीती नागरिकांना देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक विलास कुडाळकर यांनी प्रशासनाकडे केली. त्यावर लवकरच विशेष सभा बोलावण्यात येणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगीतले. याबाबत आतापर्यंत ८६ तक्रारी आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कुडाळ…

Read Full News

यश मिळविण्यासाठी कौशल्य विकसित करा…

गिरीश तिरोडकर :कुडाळ हायस्कुल मध्ये गुणगौरव सोहळा उत्सहात संपन्न.. ⚡कुडाळ ता.२४- : अपयशाने कधीही खचून जाऊ नका कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. यश मिळेपर्यंत प्रयत्न करा. यशाला शार्टकट नसतो. कायम अपडेट राहा. एआयच्या(AI) जमान्यात नोकऱ्या मिळणार नाही याची काळजी करू नका. तुमच्यातील कौशल्य विकसित करा यश नक्की मिळेल असा मोलाचा सल्ला सीए गिरीश…

Read Full News

कुडाळ न्यायालयात “वरिष्ठजन अधिकार सशक्तीकरण और गरिमा” या कार्यक्रम…

ज्येष्ठ नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांची दिली माहिती.. ⚡कुडाळ ता.२४-: येथील दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांच्या संयुक्त विदयमाने दिवाणी न्यायालय कुडाळ येथे दिनांक १५ जून २०२६ रोजी, कुडाळ दिवाणी न्यायालयचे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती नम्रता अमेय बकरे यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ नागरीकांसाठी “वरिष्ठजन अधिकार सशक्तीकरण और गरिमा” या कार्यक्रमाचे…

Read Full News

सायबर फसवणुकीपासून सावध राहा; विद्यार्थ्यांना बांदा पोलिसांचे मार्गदर्शन…

⚡बांदा ता.२४-: “आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या संदेशांना प्रतिसाद देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक टाळावे आणि वैयक्तिक तसेच बँक खात्याशी संबंधित माहिती कोणालाही देऊ नये. सायबर फसवणुकीचा बळी ठरल्यास तातडीने १९३० हेल्पलाइन किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,” असे आवाहन बांदा पोलीस…

Read Full News

कणकवली नगरपंचायतीत ‘एकल महिला दिवस’ उत्साहात साजरा…

विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा सन्मानपूर्वक स्वीकार:महिलांच्या समस्या, योजना व स्वावलंबनावर सविस्तर चर्चा.. कणकवली : संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेल्या २३ जून ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिना’निमित्त महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित राज्य एकल महिला धोरणाच्या अनुषंगाने कणकवली नगरपंचायत येथे ‘एकल महिला दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. ‘विधवा’ या शब्दाऐवजी ‘एकल महिला’ ही सन्मानजनक संज्ञा वापरत शहरातील महिलांना निमंत्रित करण्यात…

Read Full News

मळेवाड पंचक्रोशीत हाय व्होल्टेजमुळे विद्युत उपकरणांचे नुकसान…

⚡सावंतवाडी ता.२४-: मळेवाड पंचक्रोशीतील नागरिकांना सध्या वारंवार होणाऱ्या वीजपुरवठ्यातील अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिसरात हाय व्होल्टेजचा त्रास वाढल्याने अनेक घरांमधील विद्युत उपकरण निकामी होत आहेत तसेच इतर विद्युत उपकरणांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात येत आहेत. याशिवाय विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या लागून वीज पुरवठा खंडित होत आहे.मात्र ह्या बाबत पावसाळ्याआधी या विद्युत…

Read Full News

कुडाळ न.प.चे कंत्राटी सल्लागार एक वर्ष पेमेंटविना…

कार्यमुक्त करण्याची कंत्राटी सल्लागारांची विनंती :काम असेल तरच बसा, नाहीतर सभागृहाबाहेर जाण्याचे त्यांना आदेश.. ⚡कुडाळ ता.२४-: कुडाळ नगर पंचायतचे कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेले सल्लागार नरसू बाबू रेडकर यांचे गेल्या वर्षभराचे पेमेंट नगर पंचायतीने दिलेच नसल्याची बाब आज झालेल्या कुडाळ नगर पंचायतच्या मासिक बैठकीत समोर आली. आपले पेमेंट वर्षभर मिळत नसल्याने मला थकीत पेमेंट देऊन कार्यमुक्त…

Read Full News

फोंडाघाटमध्ये मध्यरात्री भूकंपसदृश धक्के; चार घरांना तडे…

विद्यानगर-बेलदारवाडी परिसरातील घरांचे नुकसान:सरपंच संजना आग्रे यांची घटनास्थळी पाहणी.. ⚡कणकवली ता.२४-: तालुक्यातील फोंडाघाट येथील विद्यानगर-बेलदारवाडी परिसरात २३ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ११:३० ते ११:४५ वाजण्याच्या दरम्यान भूकंपसदृश धक्के जाणवल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या धक्क्यांमुळे परिसरातील चार घरांचे नुकसान झाले असून घरांच्या भिंतींना मोठ्या भेगा पडल्या आहेत. या घटनेत रविंद्र सुरेश चव्हाण, दत्ताजी सुरेश चव्हाण,…

Read Full News

सिंधुदुर्गातील ४३८ पदवीधर शिक्षकांना दिलासा…

जिल्ह्याबाहेर जाण्याची टळली वेळ”:पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास ४३८ पदवीधर शिक्षक अतिरिक्त होऊन जिल्ह्याबाहेर जाण्याची स्थिती निर्माण झालेली असताना सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री श्री.नितेशजी राणे यांनी शालेय शिक्षण मंत्री यांच्याशी चर्चा करून दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सभेत ‘माझ्या जिल्हयातील कोणीही शिक्षक जिल्हयाबाहेर जाणार नाही’ असे आश्वासित करून सदरच्या पदवीधर…

Read Full News

You cannot copy content of this page