Headlines

संजय पाटील यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्रदान

⚡वेंगुर्ला ता.११-: शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्याल, वेंगुर्लाचे मुख्य लिपिक संजय अर्जुन पाटील यांना मुंबई विद्यापीठाचा गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी हा पुरस्कार प्राप्त झाला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महाविद्यालयांसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रुपये ५००० असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Read More

मुसळधार पावसाने होडावडा पूलावर पाणी तर भाविकांचा हिरमोड

⚡वेंगुर्ला ता.११-: शनिवारी सायंकाळीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे होडावडा पुलावरुन पाणी वहात होते. त्यामुळे काहीकाळ सावंतवाडी-तळवडे-वेंगुर्ला या मार्गाने होणारी वाहतूक ठप्प झाली. तर अकराव्या दिवशीच्या गणपती विसर्जनाला भक्तांचा हिरमोड झाला.

Read More

ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा उद्या

⚡सावंतवाडी ता.११-: : सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा उद्या सोमवार १२ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सालईवाडा येथील ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र येथे आयोजित करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व सभासदांनी या सभेस वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे.

Read More

युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे आयोजीत रक्तदान शिबिराला प्रतिसाद

⚡कणकवली ता.११-: कणकवली तालक्यातील युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे यांच्यावतीने कै. सुधीर सावंत यांचा ९ वा स्मृतिदिन ११ सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. भाजपा विभागीय कार्यालय कनेडी बाजारपेठ येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी जि. प. अध्यक्ष संजना संदेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयावर 15 सप्टेंबर रोजी जातीय प्रवृत्तीचा मडका फोड मोर्चा

मोर्चामध्ये परिवर्तनवादी विचारसरणीचे बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी होणार ⚡कणकवली ता.११-:मानवतेला काळीमा फासणाऱ्या, क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या अनेक घटना देशभरातघडत आहेत. सिंधुदुर्गजिल्ह्यातही जातीय अत्याचाराचे प्रकार घडत असतात. त्याला आळा बसावा, या उद्देशाने जिल्हयातील वंचित बहुजन आघाडीसह सर्व बौद्धधर्मिय, चर्मकार समाज ,मुस्लिम संघटनांनी मिळून जातीय प्रवृत्तीचा मडका फोड मोर्चा आयोजित केला आहे. हा मोर्चा गुरुवार, १५ सप्टेंबरला सकाळी…

Read More

सिंधुदुर्ग शिक्षकेत्तर संघटनेचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा

भरती संदर्भात दिले निवेदन सावंतवाडीमाध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांना सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर संघटनेतर्फे निवेदन देऊन तात्काळ शिक्षकेतरांची नोकर भरती सुरू करावी अशा आशयाचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा दीपकभाई केसरकर यांच्याशी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकेतर कर्मचारी बांधवांचे विविध प्रश्न प्रलंबित असताना गेल्या कित्येक वर्षापासून नोकर…

Read More

वामनाश्रम स्वामी यांनी चातुर्मास सोहळ्याची गंगापूजनाने केली सांगता

⚡कणकवली ता.११-: चातुर्मास सोहळ्यानिमित्ताने कणकवलीत गेले दोन महिने भक्तीमय वातावरण निर्माण करणाऱ्या श्री श्री श्री वामनाश्रम स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या 19 व्या चातुर्मास सोहळ्याची कणकवलीत गणपती साना येथे गंगापूजनाने सांगता झाली.कणकवली गणपती साना येथे आणलेल्या विशेष बोटी मधून वामनाश्रम स्वामी यांनी जानवली नदीपात्रात जात गंगा पूजन केले. त्यानंतर सजवलेल्या रथातून वामनाश्रम स्वामी…

Read More

पंचम खेमाराज महाविद्यालयाला माजी प्राचार्य कोपरकर यांचे कुटुंबीय देणार भेट

१३ रोजी संस्था करणार उत्साही स्वागत ⚡सावंतवाडी ता.११-: राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांच्याकडे शिक्षण क्षेत्रातील विविध मुख्याध्यापकांनी, पालकांनी अशी मागणी केली होती की, सावंतवाडीमध्ये उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी एखादे महाविद्यालय असावे तेव्हा १९६०साली दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली. राजेसाहेबांनी आपल्या पित्याच्या स्मरणार्थ श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची स्थापना केली.या महाविद्यालयाच्या प्रथम प्राचार्य पदी डॉ दत्तात्रय…

Read More

दक्षिण गोव्याची जबाबदारी नारायण राणेंकडे

मतदारसंघाचा घेतला आढावा : लोकसभा मतदारसंघ जिंकणारच असल्याचा व्यक्त केला विश्वास पणजी: केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे भाजपने दक्षिण गोव्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यांनी आज या मतदारसंघाचा आढावा घेत हा लोकसभा मतदारसंघ जिंकणारच असा विश्वास व्यक्त केला. पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री राणे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,…

Read More

तेरेखोल नदीचे पाणी बांदा आळवाडी भागात घुसले

रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळे नदीने ओलांडले पात्र ⚡बांदा ता.११-: रात्रभर संततधारपणे कोसळत असलेल्या पावसाने तेरेखोल नदीचे पाणी बांदा शहरातील आळवाडी भागात शिरले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने शहरात पुरस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले असून सरपंच अक्रम खान, तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी तात्काळ पुरस्थितीची पाहणी करत व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या…

Read More
You cannot copy content of this page