⚡कणकवली ता.११-: कणकवली तालक्यातील युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे यांच्यावतीने कै. सुधीर सावंत यांचा ९ वा स्मृतिदिन ११ सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. भाजपा विभागीय कार्यालय कनेडी बाजारपेठ येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी जि. प. अध्यक्ष संजना संदेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सांगवे सरपंच मयुरी मुंज, दरिस्ते सरपंच संजय सावंत, कुंभवडे उपसरपंच रॉबर्ट डिसोझा, बाबु सावंत, नितीन गावकर, प्रफुल्ल काणेकर, राजू सापळे, बाबु वाळके आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत भिरवंडे येथे ज्येष्ठ नागरिक सत्कार आणी ब्लॅकेट वाटप कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. सर्व उपस्थितांचे माजी जि. प अध्यक्ष
संदेश उर्फ गोट्या सावंत, युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा माजी जि. प अध्यक्ष
सौ. संजना संदेश सावंत यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
