शस्त्र परवाना नुतनीकरणासाठी परवानाधारकांनी अर्ज दाखल करावा
⚡सिंधुदुर्गनगरी ता.१८-: ज्या शस्त्र परवानाधारकांच्या परवान्याची मुदत दि. 31 डिसेंबर 2022 रोजी संपत आहे, त्यांनी आपल्या परवान्याच्या नुतनीकरणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयात उपचिटणीस शाखेत नेमून दिलेल्या दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत आवश्यक माहितीसह विहीत नमुन्यात अर्ज दाखल करावा, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी यांनी केले आहे. 00000
