उमेद फाउंडेशनने केली वंचितांची दिवाळी गोड

⚡कणकवली ता.१८-: उमेद फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक बांधिलकीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २०० कुटुंबे व वृद्धाश्रम या ठिकाणी दिवाळी फराळ वाटप करून वंचितांच्या दारी दिवाळी साजरी करण्यात आली.

उमेद फाउंडेशन मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २०० कुटुंबांच्या दारी उमेद फाउंडेशन च्या सदस्यांनी फराळ किट पोहोच करून वंचीतांची दिवाळी गोड केली. याशिवाय दिविजा वृद्धाश्रम असलदे, जीवदान विशेष शाळा कुडाळ व सविता आश्रम येथेही दिवाळी फराळ व कपडे यांचे वाटप करण्यात आले.

उमेद मार्फत शैक्षणिक साहित्य वितरण, उमेद शिष्यवृत्ती,करियर मार्गदर्शन, जि.प.क्रीडामहोत्सवात प्रथमोपचार कीट असे विधायक कार्यक्रम राबविले जातात.

मोहिम प्रमुख म्हणून प्रदीप पाटील यांनी तर समन्वयक म्हणून राजेंद्र एस. पाटील यांनी काम पाहिले.
या दिवाळी फराळ किट पॅकिंग व तालुकावार वितरण यासाठी सौ.शोभा पाटील, शीतल पाटील, मेघा नाळे, हांडे मॅडम, रेखा धावले, स्मितल घुगरे, सुजाता तोडकर, स्वाती पाटील, प्रेरणा पाटील,श्री प्रदीप नाळे, सागर पेंडूरकर, नितीन पाटील,स्वप्नील तोडकर, समिल घुगरे, सचिन कांबळे, जयकुमार पाटील, विजय मसुरकर, विजय भोगले, मनोज गुंजाळ, जे डी पाटील, यांनी विशेष मेहनत घेतली.

ही संपूर्ण मोहीम समाजातील दानशूर व्यक्तींच्या देणगीमुळे पूर्ण होऊ शकली तर उमेदीयन यांनी ती यशस्वी केली याबद्दल उमेद फौंडेशनचे संस्थापक सदस्य प्रकाश गाताडे यांनी सर्वांचे आभार मानले.

You cannot copy content of this page