मोहन भोई वेंगुर्ला पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी

⚡वेंगुर्ला ता.१८-: वेंगुर्ला पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार आज शुक्रवारी मोहन बापू भोई यांनी स्वीकारला. विद्यमान प्रभारी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले.

  कुडाळ तालुक्यातील केरवडे येथील श्री. भोई हे सद्या सावंतवाडी पंचायत समितीमध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी आज वेंगुर्ला पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी लघु पाटबंधारे, कुडाळ येथे कनिष्ठ सहाय्यक उपअभियंता, वेंगुर्ल पंचायत समितीमध्ये वरिष्ठ सहाय्यक, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण माध्यमिक विभाग येथे अधिक्षक, कणकवली पंचायत समितीमध्ये कक्ष अधिकारी म्हणून काम केले आहे.

फोटोओळी – वेंगुर्ला पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विद्याधर सुतार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले.

You cannot copy content of this page