नागरिकांनी नवीन आधार कार्ड काढून घ्यावे

अथवा जुने आधार कार्ड अद्यावत करुन घ्यावे-:निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१८-: नागरिकांना आधार कार्ड काढतांना काही अडचणी निर्माण होत होत्या यावर उपायोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांचे आधार कार्ड अद्ययावत करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी बाबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्‍हा नियोजन सभागृहात प्रशिक्षण घेण्यात आले.यामुळे आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया जलद होईल,तरी नागरिकांनी नवीन आधार कार्ड काढून घ्यावे अथवा जुने आधार कार्ड अद्यावत करुन घ्यावे, असे आवाहन, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी केले आहे.

            नवीन आधार कार्ड काढणे तसेच आधार कार्ड अपडेट करण्यासंबंधी सर्व आधार केंद्र चालकांना प्रशिक्षण देण्यात आले. सर्व नागरिकांनी आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे. तसेच दहा वर्षापूर्वी आधार कार्ड काढलेल्या परंतु माहिती अद्यावत न झालेल्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यासंबंधी प्रशिक्षण यावेळी आधार केंद्र चालकांना देण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती तंत्रज्ञान विभागाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक रुपेश मिरजगावकर,वरिष्ठ सहाय्यक अभियंता शितल प्रभू, तसेच आधार प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक मयुर आयरे उपस्थित होते. या प्रशिक्षणास जिल्ह्यातील सर्व आधार केंद्र चालक उपस्थित होते.
You cannot copy content of this page