जिल्हा बालकामगार मुक्त करण्यसाठी सहकार्य करावे

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१८-: बालकामगार या सामाजिक अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी याकरिता सातत्याने शासनाच्या विविध विभागामार्फत व विविधस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. 14 नोव्हेंबर “बालदिन” या दिवसाचे औचित्य साधून दि 14 नोव्हेंबर 2022 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत बालकामगार प्रथे विरोधी सप्ताह या कार्यालयामार्फत साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व औद्यागिक संघटना, असोसिएशन,व्यापारी असोसिएशन,हॉटेल असोसिएशन,क्रिडाई- बांधकाम व्यवसायातील मालक असोसिएशन व वीटभट्टी असोसिएशन, सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, नागरीक यांनीही या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्याकरिता जनजागृती करुन या मोहिमेत सहभाग नोंदवावा व आपला जिल्हा बालकामगार मुक्त करण्यसाठी सहकार्य करावे,असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे.

            14 वर्षाखालील बालकास सर्वस व्यवसाय व प्रक्रियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियांमध्ये कामगार ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे. फौजदारी गुन्ह्यासाठी 6 महिने ते 2 वर्षापर्यंत वाढविता येईल इतक्या तुरुंगवासाची शिक्षा किंवा किमान रु. 20 हजार व कमाल रु. 50 हजार इतका दंड किंवा दोन्हीही शिक्षा मालकास होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास, किमान 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत वाढविता येईल  इतकी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

0000

You cannot copy content of this page