Headlines

कळसुलीत बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी

⚡कणकवली ता.१८-:एक वर्षाच्या गायीच्या वासरावर बिबट्याने घरासमोर येवून हल्ला केल्याने या हल्ल्यात वासरू जखमी झाले आहे ही घटना कणकवली तालुक्यातील कळसुली मधलीवाडी येथे घडली आहे. कळसुली मधलीवाडी येथीलबबन विठोबा खरात यांच्या एक वर्षाच्या गायीच्या वासरावर बिबट्याने घरासमोर येवून हल्ला केला. ही घटना शनिवारी पहाटे 4 च्या सुमारास घडली आहे. बिबट्याने गायीच्या वासराला मानेला पकडले असता…

Read More

पहिल्या दोन टप्प्यात बांदा ३२ टक्के मतदान

शांततेत मतदान प्रक्रिया सुरू ⚡बांदा ता.१८-: बांदा ग्रामपंचायत च्या सार्वत्रिक निवडणुकीत सकाळच्या सत्रात मतदारांनी उस्फुर्त प्रतिसाद दाखविला. दुपारी १२ वाजेपर्यंत बांद्यात एकूण ३२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. दुपारपर्यंत कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान प्रक्रिया सुरु होती.बांद्यात भाजपा पुरस्कृत पॅनलच्या प्रियांका नाईक यांच्याविरोधात गाव विकास पॅनलच्या अर्चना पांगम यांच्यात सरपंच पदासाठी…

Read More

अमेरिकेतून येत केले आईला मतदान

चराठा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंच उमेदवार मारीता फर्नांडिस यांच्या मुलाने बजावला मतदानाचा हक्कआपली आई विजयी होण्यासाठी अमेरिकेतून आलो:- क्लाईवजो ⚡सावंतवाडी ता.१८-: चराठे गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीन मारीता बावतीस फर्नांडिस यांना थेट सरपंच पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात उभे केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मतदानानिमित्त त्यांचा मुलगा अमेरिकेतून थेट आपल्या आईच्या मतदान करण्यासाठी तो चराठा येथे आला असून त्यांनी…

Read More

सावंतवाडी तालुक्यात शांततेत मतदानास सुरुवात

⚡सावंतवाडी ता.१८-: ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदानाच्या प्रक्रियेस शांततेत सुरवात झाली. सकाळच्या पहिल्या टप्प्यात चराठा येथील मतदान केंद्रावर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला तर काही मतदान केंद्रावर संथगतीने मतदान सुरू आहे.या निवडणुकीत शिंदे गट – भाजप व महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. .

Read More

विक्रांत सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

⚡सावंतवाडी ता.१८-: ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदाना आज होत असल्याने उद्धव ठाकरे गटाचे सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी माजगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

सबनीसवाडा येथील यशवंत बांदेकर यांचे निधन

⚡सावंतवाडी ता.१८-: सबनीसवाडा येथील रहिवासी यशवंत सखाराम बांदेकर यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, दोन पुतणे, जावई ,नातू असा परिवार आहे. निलेश बांदेकर यांचे ते वडील तर राजू बांदेकर व वासुदेव बांदेकर यांचे ते काका होत

Read More

पहिल्या दिवशी ५०० मी, एक आणि दोन मीटर जलतरण स्पर्धा संपन्न

मालवण चिवला बीच येथे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा आहे सुरू मालवण दि प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणच्या चिवला बीचवर आयोजित राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी झालेल्या ५०० मीटर, १ किमी आणि २ किमी अंतराच्या जलतरण स्पर्धेत पाखी हलगेकर (बेळगाव), प्रिन्स काठवले (ठाणे), वेदांत…

Read More

शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत सातारा संघाची बाजी

वराडकर हायस्कूल येथे संपन्न झाल्या स्पर्धा मालवण दि प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत सातारा संघाने वर्चस्व स्थापित केले. या स्पर्धेमध्ये सांगली, कोल्हापूर, कोल्हापूर महानगरपालिका, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा या…

Read More

मालवणात उद्या १३९ मतदान केंद्रावर मतदान

४७ ग्राम पंचायतसाठी होतेय मतदान मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यात ४७ ग्रामपंचायती साठी उद्या दि. १८ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. तालुक्यात एकूण १३९ मतदान केंद्रांवर उद्या सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजे पर्यंत मतदान प्रक्रिया होणार असून यासाठी तहसील प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मालवण तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. यातील…

Read More

४५ सरपंच पदासह ४९ ग्राम पंचायतसाठी उद्या मतदान

६७७ कर्मचारी नियुक्त सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील ५२ पैकी ३ ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यात गेळे, नेतर्डे व कुडतरकरटेंब या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर एकूण ७ सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरीत तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या व ४५ सरपंचपदासाठीची निवडणूक रविवार १८ डिसेंबरला होत आहे. यासाठी मतदान अधिकाऱ्यांसह ६७७ अधिकारी व कर्मचारी…

Read More
You cannot copy content of this page