मालवण चिवला बीच येथे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा आहे सुरू
मालवण दि प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणच्या चिवला बीचवर आयोजित राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी झालेल्या ५०० मीटर, १ किमी आणि २ किमी अंतराच्या जलतरण स्पर्धेत पाखी हलगेकर (बेळगाव), प्रिन्स काठवले (ठाणे), वेदांत मिसळे (बेळगाव), रेवा परब (ठाणे), आयुषी आखाडे (ठाणे), अनिष पई (बेळगाव) यांनी विजेतेपद मिळवीत ‘वेगवान जलतरणपटू’ चा मानही मिळविला.
मालवण चिवला बीच येथे आज सकाळी साडे सात वाजल्यापासून या स्पर्धेस सुरुवात झाली. यावेळी ५०० मीटर, १ कि.मी., २ कि.मी. अंतराच्या मुलगे- मुली तसेच ज्येष्ठ पुरुष व महिला यांच्या गटाच्या जलतरण स्पर्धा पार पडल्या. तर त्यानंतर दिव्यांग पुरुष व महिलांच्या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेला उत्स्फूर्त लाभत सुमारे ५०० स्पर्धक सहभागी झाले होते. तर दिव्यांग स्पर्धकांचा उत्साह देखील लक्षवेधी ठरला. उद्या. १८ रोजी ३ किमी व ५ किमी अंतराच्या जलतरण स्पर्धा होणार आहेत.
विविध गटात विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तर वेगवान जलतरण पटूंना चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष डॉ. दीपक परब, सचिव राजेंद्र पालकर, ऍड. नाखवा, उपाध्यक्ष राजेश मोरे, माजी सचिव किशोर वैद्य, आनंद माने, संतोष रावराणे, निल लब्दे, डॉ. राहुल पंतवालावलकर, नगरपालिकेचे अभियंता सुधाकर पाटकर, नगर अभियंता सौ. सोनाली हळदणकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, भाजपच्या सौ. अन्वेषा आचरेकर, आदी व इतर उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- ५०० मीटर मुलगे – १. प्रिन्स काठवले (ठाणे), २. आर्यवीर पांडा (पालघर), ३. दक्ष तेकचांदणी (ठाणे). ५०० मीटर मुली – १. पाखी हलगेकर (बेळगाव), २. माही जांभुळे (ठाणे), ३. नायरा कौशल (ठाणे). १ कि.मी. मुलगे – १.वेदांत मिसळे (बेळगाव), २. तनय लाड (ठाणे), ३.रेयांश बुगलिया (रायगड), १ किमी मुली – १. रेवा परब (ठाणे), २.दिशा होंडी (बेळगाव), ३. इयाना पटेल (नाशिक). २ किमी मुलगे- १. अनिष पई (बेळगाव), २. रुद्र बच्छाव (नाशिक), ३. परीन पाटील (ठाणे). २ किमी मुली – १. आयुषी आखाडे (ठाणे), २. मिनेरवा पाटील (पुणे), ३. आकांक्षा राणा (नाशिक). २ कि.मी. पुरुष ज्येष्ठ गट – १. नारायण हजारे (सांगली), २. महादेव तावरे (पुणे), ३. प्रकाश किल्लारे (कोल्हापूर). २ कि.मी. महिला ज्येष्ठ गट – १. स्वस्तिका गिरकर (रायगड), २. गायत्री फडके (पुणे), ३. सोनलस्मित पाटील (मुंबई).
दिव्यांग पुरुष मोठा गट- १. ओम जुवाली (बेळगाव), २. सुफियान जोशी (मुंबई), ३. आदि गोसर (मुंबई). दिव्यांग मुलगे लहान गट – १. अद्वैत काटे (बीड), २. सष्मीत अहिरे (नाशिक), ३. सुमित मुतगेकर (बेळगाव). दिव्यांग महिला गट- १. सिमरन गौंडळकर (बेळगाव), २. दिव्या पिल्लई (नागपूर), ३. अंजना प्रधान (नाशिक), ४. वरदा कुलकर्णी (पुणे). दिव्यांग मुली लहान गट – १. शरण्या कुंभार (बेळगाव), २. सोनाक्षी शुक्ला (मुंबई), ३. सायशा सहानी (मुंबई).
