वराडकर हायस्कूल येथे संपन्न झाल्या स्पर्धा
मालवण दि प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत सातारा संघाने वर्चस्व स्थापित केले.
या स्पर्धेमध्ये सांगली, कोल्हापूर, कोल्हापूर महानगरपालिका, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्याचे संघ सहभागी झालेले होते. स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक सागर मालवदे यांनी केले. यावेळी क्रीडा अधिकारी विजय शिंदे, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनील नाईक, सचिव श्रीमती विजयश्री देसाई, स्कूल कमिटी चेअरमन सुधीर वराडकर, मुख्याध्यापक संजय नाईक, माजी मुख्याध्यापक अनिल फणसेकर, माजी मुख्याध्यापक सर्जेराव पाटील उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील १७ वर्षाखालील तसेच १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने सहभाग नोंदविला. या तिन्ही वयोगटातून सातारा जिल्ह्याच्या तिन्ही वयोगटाच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला.
या स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे १४ वर्षाखालील मुली : प्रथम सातारा, द्वितीय रत्नागिरी, तृतीय – कोल्हापूर. १७ वर्षाखालील मुली – प्रथम- सातारा द्वितीय कोल्हापूर, तृतीय – सिंधुदुर्ग. १९ वर्षांखालील प्रथम – सातारा, द्वितीय – सिंधुदुर्ग, तृतीय – कोल्हापूर.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे क्रीडाशिक्षक संजय पेंडूरकर, किसन हडलगेकर, रामकृष्ण सावंत, भूषण गावडे, शाळेच्या पर्यवेक्षिका देवयानी गावडे उपस्थित होते. या स्पर्धेसाठी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा कट्टा यांच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रदीप व प्रवीण मिठबावकर, गणेश वाईरकर यांचे सहकार्य लाभले. तर दुसऱ्या दिवशी झालेल्या सामन्यात कोल्हापूर सांगली मनपा यांनी उज्ज्वल यश संपादन केले.
दुसऱ्या दिवशी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस उपस्थित होत्या. व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आनंद वराडकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, संचालिका स्वाती वराडकर, स्मिता कॉम्प्युटरच्या संचालिका श्रद्धा नाईक, साबाजी गावडे, क्रीडा अधिकारी विजय शिंदे, उद्योजक मंगेश माडये, संदीप सरमळकर, गणेश विजय वाईरकर, बंडू सावंत, मुख्याध्यापक संजय नाईक, पर्यवेक्षिका देवयानी गावडे, क्रीडा शिक्षक संजय पेंडुरकर, किसन हडलगेकर, रामकृष्ण सावंत, भूषण गावडे व इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- १४ वर्षाखालील मुलगे- प्रथम- सांगली मनपा, द्वितीय- सातारा जिल्हा, तृतीय- रत्नागिरी जिल्हा. सतरा वर्षाखालील मुलगे – प्रथम- सांगली मनपा, द्वितीय- कोल्हापूर जिल्हा, तृतीय- सातारा जिल्हा. १९ वर्षाखालील मुलगे – प्रथम – कोल्हापूर जिल्हा, द्वितीय – सातारा जिल्हा, तृतीय – रत्नागिरी जिल्हा.
