अमेरिकेतून येत केले आईला मतदान

चराठा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंच उमेदवार मारीता फर्नांडिस यांच्या मुलाने बजावला मतदानाचा हक्क
आपली आई विजयी होण्यासाठी अमेरिकेतून आलो:- क्लाईवजो

⚡सावंतवाडी ता.१८-: चराठे गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीन मारीता बावतीस फर्नांडिस यांना थेट सरपंच पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात उभे केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मतदानानिमित्त त्यांचा मुलगा अमेरिकेतून थेट आपल्या आईच्या मतदान करण्यासाठी तो चराठा येथे आला असून त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

आपल्या आईला विजयी करण्यासाठी थेट अमेरिकेतून मुलगा गावात मतदान करण्यासाठी हजर राहिल्याने माय-लेकाचे प्रेम सर्वांना आदर्शच बनले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. क्लाइवजो बावतीस फर्नांडीस असे त्या मुलाचे नाव आहे.

You cannot copy content of this page