पहिल्या दोन टप्प्यात बांदा ३२ टक्के मतदान

शांततेत मतदान प्रक्रिया सुरू

⚡बांदा ता.१८-: बांदा ग्रामपंचायत च्या सार्वत्रिक निवडणुकीत सकाळच्या सत्रात मतदारांनी उस्फुर्त प्रतिसाद दाखविला. दुपारी १२ वाजेपर्यंत बांद्यात एकूण ३२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. दुपारपर्यंत कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान प्रक्रिया सुरु होती.
बांद्यात भाजपा पुरस्कृत पॅनलच्या प्रियांका नाईक यांच्याविरोधात गाव विकास पॅनलच्या अर्चना पांगम यांच्यात सरपंच पदासाठी थेट लढत होत आहे. शहरात ८ मतदान केंद्रे आहेत. सर्वच केंद्राच्या बाहेर बूथ लावून पदाधिकारी व कार्यकर्ते मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. भाजपा कडून माजी सभापती प्रमोद कामत, सरपंच अक्रम खान, मंदार कल्याणकर, श्वेता कोरगावकर, शीतल राऊळ तर गाव विकास पॅनेल कडून सुशांत पांगम, साईप्रसाद काणेकर आदी तळ ठोकून आहेत.
दुपारनंतर मात्र मतदानाचा टक्का घसरला. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सकाळी मतदारांनी गर्दी केली होती. सायंकाळच्या सत्रात जास्तीत जास्त मतदारांना घराबाहेर काढण्याचे आवाहन उमेदवा्रांसमोर आहे. त्यामुळे सायंकाळी मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.

You cannot copy content of this page