कळसुलकरच्या कॅरम खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
⚡सावंतवाडी ता.०३सहदेव राऊळ-: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीच्या दोन विद्यार्थिनींनी शालेय कॅरम स्पर्धेमध्ये तालुकास्तर जिल्हास्तर व विभागस्तर स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केल्याने त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या विभागीय स्पर्धेमध्ये प्रशालेचे प्रतिनिधित्व करत कुमारी प्रणिता नथुराम आयरे (वयोगट-१७) हिने…
