मोती तलावाच्या कठडा कामाला सुरुवात…

एक कोटी निधी उपलब्ध.._

⚡सावंतवाडी ता.०३-: बहुचर्चित ठरलेल्या मोती तलावाच्या कठड्याच्या कामाला अखेर आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. या कामाचा शुभारंभ काही दिवसापूर्वी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला होता.

दरम्यान हे काम पूर्ण होण्यासाठी अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी, नागरिकांनी प्रयत्न केले होते. या कामासाठी तब्बल ५०-५० लाखाच्या अशा दोन निविदा काढण्यात आल्या आहेत.दरम्यान एक कोटी रूपयांचा खर्च या कामासाठी होणार आहे.

You cannot copy content of this page