जिल्हा बँकेच्या धनवृध्दी ठेव योजनेचा शुभारंभ

अध्यक्ष मनीष दळवी यांच्याहस्ते जिल्हा प्रधान कार्यालयात पार पडला कार्यक्रम

⚡ओरोस ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने ठेवीदारांसाठी नववर्षाची भेट म्हणून ०२जानेवारी २०२३ पासून जादा व्याजदराची धनवृध्दी विषेश ठेव योजना सुरू केली आहे या योजनेचा शुभारंभ सोमवार दिं.०२ जाने.२०२२ रोजी बँकेचे अध्यक्ष श्री.मनिष दळवी यांच्या हस्ते बँकेचे प्रधान कार्यालय,ओरोस येथे करण्यात आला.

यावेळी जिल्हा बँक संचालक गजानन गावडे, समीर सावंत,श्रीम.नीता राणे, विठ्ठल देसाई जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारीअधिकारी प्रमोद गावडे,बँक अधिकारी,कसाल शाखेचे व्यवस्थापक विजय शृंगारे, श्रीम. रजनी कदम, ठेवीदार यावेळी उपस्थित होते. शुभारंभ प्रसंगी कसाल शाखेने एका दिवसात सुमारे रू.१कोटी ठेव गोळा केली असुन ठेव प्रमाण पत्र बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व बँक संचालक महोदय यांचे हस्ते ठेवीदारांना यावेळी देण्यात आले. जिल्ह्यातील ग्राहक व ठेवीदारांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर दाखवलेल्या विश्वासा पध्दल त्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.असाच विश्वास ग्राहक व ठेवीदारांनी कायम बँकेवर ठेवावा.सर्व आर्थिक व्यवहार आमच्या बँके मार्फत करावेत.तसेच सिंधु धनवृध्दी ठेव योजनेत जिल्हा वासियानी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी यावेळी केले.

You cannot copy content of this page