दिगंबर नाईक यांच्यासह दिग्गज कलाकार देखील राहणार उपस्थित
⚡कणकवली ता.०३-: कणकवली नगरपंचायत आयोजित पर्यटन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ७ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे, सायली कांबळे व यांच्या गाण्याचा आनंद कणकवली वासीयांना लुटता येणार आहे. तसेच यावेळी सुप्रसिद्ध हास्य कलाकार दिगंबर नाईक, किशोरी अंबिये, सुहास परांजपे, डांसर हेमलता बाणे, व अन्य अनेक दिग्गज कलाकार यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.
