कळसुलकरच्या कॅरम खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

⚡सावंतवाडी ता.०३सहदेव राऊळ-: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीच्या दोन विद्यार्थिनींनी शालेय कॅरम स्पर्धेमध्ये तालुकास्तर जिल्हास्तर व विभागस्तर स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केल्याने त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या विभागीय स्पर्धेमध्ये प्रशालेचे प्रतिनिधित्व करत कुमारी प्रणिता नथुराम आयरे (वयोगट-१७) हिने कॅरम खेळात द्वितीय क्रमांक मिळविला तर १४ वर्षे वयोगटातून कुमारी साक्षी रमेश रामदुरकर हिने विभागस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी मान मिळवला. १४ ते १६ जानेवारी रोजी चिपळूण (डेरवण) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या दोघीही खेळाडू विद्यार्थिनींची निवड झालेली आहे. या दोन्ही खेळाडू विद्यार्थिनींना प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री नारायण शंकर केसरकर यांचे सहकार्य लाभले. तसेच कार्यालयीन कामकाजासाठी प्रशालेचे पी. बी. बागुल, गझल शेख यांची विशेष मदत लाभली. या सर्व खेळाडू विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई, सचिव डॉक्टर प्रसाद नार्वेकर, सर्व संचालक मंडळ, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर, मुख्याध्यापक एन. पी. मानकर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग यांच्याकडून करण्यात आले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

You cannot copy content of this page