Headlines

नांदरुख कुर्लाभाटला येथील तरुणाचे जिल्हा रुग्णालयात निधन

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील नांदरूख कुर्ले भाटलेवाडी येथील दिपेश लहूराज चव्हाण (वय- ३४) या तरूणाचा जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपेश चव्हाण याला दारूचे व्यसन होते. त्याच्या पोटात दुखायचे. दिपेश चव्हाण याच्यावर जिल्हा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू होते. ९ रोजी…

Read More

स्वयंरोजगार सुरु करणाऱ्या महिलाना पदर प्रतिष्ठानतर्फे सहकार्य राहील

समीर नलावडे;जागतिक महिला दिनानिमित्तकर्तृत्ववान महिलांचा सन्मान व विविध कार्यक्रम ⚡कणकवली ता.०९-: जागतिक महिला दिनानिमित्त पदर महिला प्रतिष्ठानतर्फे येथील लक्ष्मी हॉलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, पदर महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण, उपाध्यक्षा हर्षदा गवाणकर, जिल्हा बँकेच्या संचालिका प्रज्ञा ढवण,…

Read More

कणकवली शिवसेना शाखेत 10 रोजी शिवजयंती साजरी होणार

⚡कणकवली ता.०९-: कणकवली शिवसेना शाखेत शुक्रवार १० मार्च रोजी शिवजयंती ( तिथीप्रमाणे) साजरी करण्यात येणार आहे. याप्रसंगी छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी ९ वाजता श्री. सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.तरी याप्रसंगी कणकवलीतील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कणकवली तालुकाप्रमुख…

Read More

शिवराई छ. शिवाजी महाराजांची अनुभूती देतात

राजा जाधव;तळेरेतील निकेत पावसकर यांच्या संग्रहात शिवराई ⚡कणकवली ता.०९-: ही शिवराई नाणे कदाचित छ. शिवाजी महराजांनी प्रत्यक्ष हातात घेतले नसेल. मात्र, त्यावेळी स्वराज्यातील मावळ्यांनी ही नाणी हाताळली आहेत. म्हणजेच अप्रत्यक्ष छ. शिवाजी महाराजांचा स्पर्श या नाण्यांना झालेला आहे. त्यामुळे ही नाणी जपून ठेव, असा सल्ला तळेरे येथील नाणी संग्राहक आणि संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर…

Read More

देऊळवाडा सातेरी मंदिरात जागतिक महिला दिन साजरा

आई सातेरी बाळगोपाळ मित्रमंडळाचे आयोजन मालवण दि प्रतिनिधी आई सातेरी बाळगोपाळ मित्रमंडळाच्या वतीने देऊळवाडा सातेरी मंदिर या ठिकाणी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महिलांसाठी विविध फणी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत गौरी वेंगुर्लेकर या विजयी ठरल्या. प्रारंभी सातेरी देवीची पूजाअर्चा करून दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या…

Read More

जुनी पेन्शन सुरू करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी १४ पासून बेमुदत संपावर

जिल्ह्यातील १७ हजार कर्मचारी होणार सहभागी;समन्वय समिती अध्यक्ष राजन कोरगावकर यांची माहिती ओरोस ता.०९-: जुनी पेन्शन सुरू करावी या प्रमुख मागण्यांसह असंख्य प्रलंबित मागण्यासाठी शासकीय कर्मचारी १४ मार्च पासून संपावर जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ५६ विभागातील १७ हजार कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी…

Read More

श्री सद्गुरू साटम महाराजांची पुण्यतिथी उत्सवात साजरी…

⚡सावंतवाडी ता.०९-: आंबोलीच्या पायथ्याशी वसलेल्या दाणोली येथील श्री सद्गुरू साटम महाराजांची 86 वा पुण्यतिथी उत्सव गुरुवारी भक्तांच्या अलोट गर्दीत पार पडला यावेळी प्रत्येकाच्या तोंडी साटम महाराजांचा जयघोष दिसून आला. आंबोली बेळगाव महामार्गाला लागून श्री साटम महाराज यांचे समाधी स्थळ तसेच त्यांचे निवासस्थान आहे या ठिकाणी दरवर्षी साटम महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला…

Read More

श्री सद्गुरू साटम महाराजांची पुण्यतिथी उत्सवात साजरी…

⚡सावंतवाडी ता.०९-: आंबोलीच्या पायथ्याशी वसलेल्या दाणोली येथील श्री सद्गुरू साटम महाराजांची 86 वा पुण्यतिथी उत्सव गुरुवारी भक्तांच्या अलोट गर्दीत पार पडला यावेळी प्रत्येकाच्या तोंडी साटम महाराजांचा जयघोष दिसून आला. आंबोली बेळगाव महामार्गाला लागून श्री साटम महाराज यांचे समाधी स्थळ तसेच त्यांचे निवासस्थान आहे या ठिकाणी दरवर्षी साटम महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला…

Read More

देवाकडील समईच्या आगीने गाऊनचा पेट घेतल्याने वयोवृद्ध महिलेचा मृत्यू…

शहरातील झिंरग येथील घटना; पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद ⚡सावंतवाडी ता.०९-: देवाकडील समईच्या आगीने गाऊनचा पेट घेतल्याने सावंतवाडी शहरातील झिरंग येथील वयोवृद्ध महिला गंबररीत्या भाजल्याने मयत पावली ही घटना दिड वाजण्याच्या सुमारास घडली. सुगंधा नारायण वंजारी वय 90 असे तिचे नाव आहे याबाबतची फिर्याद मुलगा प्रशांत वंजारी यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत अधिक…

Read More

बाल विवाह प्रतिबंध अधिनियम जनजागृतीसाठी कार्यशाळा घ्या…

उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०९-: सामुहिक विवाह सोहळ्यात एखादा बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विवाह सोहळा करणाऱ्या यंत्रणांच्या जनजागृतीसाठी तसेच बाल विवाह प्रतिबंध अधिनियमाच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी कार्यशाळांचे आयोजन करावे, असे निर्देश उपजिल्हाकारी रविंद्र मठपती यांनी दिले. • सोबत फोटो जोडला आहे.00000

Read More
You cannot copy content of this page