आई सातेरी बाळगोपाळ मित्रमंडळाचे आयोजन
मालवण दि प्रतिनिधी
आई सातेरी बाळगोपाळ मित्रमंडळाच्या वतीने देऊळवाडा सातेरी मंदिर या ठिकाणी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महिलांसाठी विविध फणी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत गौरी वेंगुर्लेकर या विजयी ठरल्या.
प्रारंभी सातेरी देवीची पूजाअर्चा करून दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी लगोरी फोडणे, मनोरा रचने, बादलीत बॉल टाकणे, ग्लास बॉल, तळ्यात मळ्यात हे खेळ घेण्यात आले. या प्रत्येक खेळातून प्रथम तीन विजेते निवडून त्यांच्यात संगीत खुर्चीचा अंतिम खेळ घेण्यात आला. यामध्ये सौ. गौरी वेंगुर्लेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर सौ. जागृती वीर यांनी द्वितीय व सौ. तनुजा मराळ यांनी तृतीय क्रमांक मिळवीला. या तिन्ही विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
तसेच या स्पर्धेत प्रणिता मराळ, अंजली वीर, रूपाली आचरेकर, दिपा आचरेकर, धनश्री मराळ, स्नेहा कदम, मिनल मराळ, अरुणा मराळ, रेश्मा वीर, गिरीजा वीर, शुभदा चव्हाण, श्रद्धा मराळ या सहभागी झालेल्या महिलांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर रूपाली आचरेकर, शुभांगी वीर, सायली मराळ, रंजना वीर, अश्विनी मराळ, विजया परब, तनुजा मराळ, लक्ष्मी धुरी या उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राजक्ता वीर, आस्था आचरेकर, आसावरी मराळ, गंधाली मराळ, समृद्धी मराळ, ज्योती कदम, समृद्धी आचरेकर, प्रांजली चव्हाण, कोमल वीर, तन्मया मराळ, सिद्धी मराळ, रीना मराळ, सिद्धी शिरपूटे, सानिका मराळ, श्रावणी चव्हाण, दिव्या चव्हाण, श्रुती मराळ, वनश्री यादव, आज्ञा आचरेकर, ईशा चव्हाण, दिक्षा वीर, लावण्या कदम, प्राची चव्हाण, भूमी चव्हाण, श्री यादव यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय वीर, राज वीर यांनी केले. शेवटी राजू आचरेकर यांनी आभार मानले.
