मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील नांदरूख कुर्ले भाटलेवाडी येथील दिपेश लहूराज चव्हाण (वय- ३४) या तरूणाचा जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपेश चव्हाण याला दारूचे व्यसन होते. त्याच्या पोटात दुखायचे. दिपेश चव्हाण याच्यावर जिल्हा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू होते. ९ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दिपेशची मामी नम्रता गावडे यांना दिपेश चव्हाण जनरल वॉर्डमधील खॉटच्या खाली झोपलेला दिसला. नम्रता गावडे यांनी या घटनेची माहिती डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी दिपेशचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी हेमंत पेडणेकर हे करत आहेत.
