शहरातील झिंरग येथील घटना; पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद
⚡सावंतवाडी ता.०९-: देवाकडील समईच्या आगीने गाऊनचा पेट घेतल्याने सावंतवाडी शहरातील झिरंग येथील वयोवृद्ध महिला गंबररीत्या भाजल्याने मयत पावली ही घटना दिड वाजण्याच्या सुमारास घडली. सुगंधा नारायण वंजारी वय 90 असे तिचे नाव आहे याबाबतची फिर्याद मुलगा प्रशांत वंजारी यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती असे की मयत सुगंधा वंजारी या वयोवृद्ध असल्याने जागीच होत्या दुपारी मुलगा प्रशांत हा औषध आणण्यासाठी बाजारात गेला असता दीड ते पावणेतीन च्या दरम्यान जवळ असलेल्या देवाकडील समईची आग तिच्या गाऊनला लागल्याने आगीने पेट घेतला यात त्या गंभीर त्या भाजल्या मुलगा प्रशांत घरी आल्यानंतर आई भाजलेल्या अवस्थेत दिसून आली त्याने तात्काळ तिला उपचाराकरता उपजिल्हा रुग्णालयात घालवले डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. याबाबत त्याने सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली असून घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक अमित गोते, गुरुनाथ भागवत यांनी जाऊन पंचनामा केला.याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
