केशवसुत कट्टयावर २एप्रिलला वसंतस्मृती संगीत मैफिल
⚡सावंतवाडी ता.२९-: कै.गुरुवर्य रघुनाथ उर्फ बाबी मेस्त्री यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ,सावंतवाडी यांच्या तर्फे “वसंतस्मृती” या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. वसंत कानेटकर, पं. वसंतराव देशपांडे, संगीतकार वसंत प्रभू, श्री वसंत पवार, संगीतकार वसंत देसाई, गीतकार वसंत निनावे, कविवर्य डॉ. वसंत सावंत यांच्या प्रतिभेतून साकार झालेल्या गीतांचा सदाबहार नजराणा…
