न्यायालयीन सुविधा उपलब्ध करण्यासाठी सहकार्य करण्याची दिली ग्वाही
⚡सावंतवाडी ता.२९-: अँड. परिमल नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांची सपत्नीक भेट घेतली. वकील संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल मंत्री चव्हाण यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
दरम्यान जिल्ह्यातील न्यायालयीन पायाभूत सुविधा व इमारती समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री चव्हाण यांनी आश्वाशीत केलं.
