कळसुली येथील ‘बोटिंग व फिशिंग’ जलपर्यटनात क्रांती घडविणार
हनुमंत सावंत;प्रकल्प जिल्ह्याच्या दृष्टीने रोजगारासाठी दिशादर्शक ठरणार ⚡कणकवली ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्ह्याला सागरी पर्यटन मोठ्या प्रमाणात लाभले आहे मात्र सह्याद्री पट्ट्यातही जलपर्यटनाचा आनंद लुटता यावा या उद्देशाने कणकवली तालुक्यातील कळसुली-देदोंनवाडी धरणात ‘बोटिंग व फिशिंग’ प्रकल्प सुरु करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा पहिलाच प्रयोग असून खऱ्या अर्थाने रोजगार देणारा हा प्रकल्प जिल्ह्याच्या दृष्टीने दिशादर्शक ठरणार आहे…
