वेत्ये श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मंडळ वरची गावकरवाडी यांचे आयोजन
⚡सावंतवाडी ता.२३-: श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मंडळ वरची गावकरवाडी वेत्ये यांच्याकडून कै. गंगाराम रामचंद्र निगुडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ खुल्या जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज भाजप युवा नेते विशाल परब यांच्या असते करण्यात आले. यावेळी विशाल परब यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
