⚡वेंगुर्ला ता.२४-: अभयकुमार देसाई चॅरिटेबल ट्रस्ट परुळेतर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ३० एप्रिल रोजी स. ९ ते दु. १ वाजेपर्यंत अण्णासाहेब देसाई विद्यालय परुळे येथे संपन्न होईल.
यात हृदय रोगतज्ञ डॉ. गौरव घुर्ये, कर्करोग तज्ञ डॉ. आदेश पालयेकर, दंतचिकित्सा डॉ. अपूर्वा ठाकुर, नेत्रचिकित्सा व मोतीबिंदु निदान डॉ.आर.बी.तेली, प्राथमिक आरोग्य तपासणी डॉ. तेजस्वीनी देसाई, डॉ. प्रणव प्रभू करणार आहेत. यावेळी शासकीय योजनेतून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. याकरीता आधारकार्ड व रेशन कार्ड आवश्यक आहे अशी माहीती देण्यात आली आहे. तरी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी ९४२१०७३९०७, ७०५७५७५७५२ यावर संफ साधावा असे आवाहन आयोजकांमार्फत केले आहे.
