Headlines

‘माझा सिंधुदुर्ग’चा शालेय शिष्यवृत्ती वितरण सोहळा संपन्न

⚡मालवण ता.१७-:माझा सिंधुदुर्ग विकास संस्था (रजि.) व संलग्न माझा सिंधुदुर्ग ग्रुप आयोजित होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम नुकताच कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये संपन्न झाला. यावेळी सिंधुदुर्गातील निराधार, अतीगरीब, प्रतिकूल परिस्थितीत शिकणाऱ्या १२० शालेय विद्यार्थ्यांना वर्षाला लागणाऱ्या संपूर्ण शैक्षणिक साहित्य शिष्यवृत्तीच्या माध्यमातुन वितरित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन या कार्यक्रमास…

Read More

विनयभंग प्रकरणी दोघांना सश्रम कारावास

मार्च २०१८ मध्ये पिंगुळी येथे घडली होती घटना;दोघांना प्रत्येकी एक लाखाचा दंड ओरोस ता १७विनायक गणपत मुंडये (वय ६४), उत्तम गणपत मुंडये (वय ५८) दोन्ही राहणार पिंगुळी गोंधळपुर यांना महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सात वर्षाचा सश्रम कारावास आणि दोघांना प्रत्येकी एक लाख रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास अधिक एक वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा…

Read More

वीज समस्यांना आ नाईक जबाबदार

देवबाग, तारकर्ली, वायरी गावांत ९ वर्षात किती ट्रांसफार्मर दिले;भाजप उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांचा आरोप ⚡मालवण ता.१७-: देवबाग, तारकर्ली गावातील वीज समस्या आणि त्यासाठी सुरु असलेले ग्रामस्थांचे आंदोलन या सर्वाला आमदार वैभव नाईक जबाबदार आहेत. भाजपवर खोटे बोलण्याचा आरोप करणारे आम. वैभव नाईक यांनीच वीज प्रश्नाबाबत वेळोवेळी रेटून खोटे बोलत ग्रामस्थांची दिशाभूल केली आहे….

Read More

जंगलतोड प्रकरणी फरार सुदीन आगरवडेकर यांना सशर्त जामीन

⚡सावंतवाडी ता.१७-: डेगवे येथील शासकीय जंगलात आपल्या साथीदारांसह तोड करून १८ मे पासून फरार असलेल्या आरोपी सुदीन श्रीराम आगरवडेकर याला काल वन विभागाने अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्याची सशर्त जामिनावर मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अँड. राहुल पै यांनी काम पाहिले.

Read More

उद्योजक प्रवीण शिरसाट यांच्या कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

⚡बांदा ता.१७-: बांदा येथील प्रसिद्ध उद्योजक प्रवीण श्रीकृष्ण शिरसाट यांनी बांदा येथील जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. बांद्यातील उद्योजक प्रवीण शिरसाट हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. आपली आई दीपलक्ष्मी श्रीकृष्ण शिरसाट यांच्या स्मरणार्थ त्यांनी चालू वर्षी बांदा…

Read More

सिंधुदुर्गातील वीज समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ८२५ कोटी मंजूर

राजन तेली: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विशेष प्रयत्नातून कोट्यावाधींचा निधी उपलब्ध.. ⚡मालवण ता.१७-: राज्य शासनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमिगत वीजवाहिन्या तसेच नवीन साहित्य व मजबुतीकरण कामांसाठी ८२५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील ३०० कोटींच्या कामांचे टेंडर काढण्यात आले असून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच कामाला सुरुवात होणार आहे. देवबाग, तारकर्ली, वायरी येथे भूमिगत वीज…

Read More

जिल्हा परिषद छपरावरून कोसळून कामगाराचा मृत्यू

अन्य एकाला दुखापत ओरोस ता.१७-: जिल्हा परिषदेच्या इमारतीवर लोखंडी पत्रे घालण्याचे काम सुरू आहे. गेले अनेक दिवस हे काम सुरू आहे. नेहमी प्रमाणे आज सकाळी हे काम सुरू असताना ९ वाजण्याच्या सुमारास जमशेद पाशा व नरेश सैनी हे दोन कामगार छपरावरून जमिनीवर कोसळले.या दोघांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील जमशेद पाशा…

Read More

गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार

⚡कणकवली ता.१७-: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या चेअरमनपदी ज्येष्ठ संचालक अरुणराव डोंगळे यांची निवड झाल्यानंतर ते प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता आमदार वैभव नाईक यांनी आपल्या निवासस्थानी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न व जिल्ह्यातील दुध उत्पादनाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

Read More

गोवा येथिल आषाढी पायी वारीचे बांदा व इन्सुलीत स्वागत

⚡बांदा ता.१७-: गोवा येथिल श्री  विठ्ठल रुक्मिणी  देवस्थान धारजोवाडा ,कुंडई फोंडा येथून  निघालेल्या श्री संत सोहिरोबानाथ आंबिये वारकरी संप्रदायाच्या कुंडई ते पंढरपूर पायी आषाढी वारीचे  शुक्रवारी सायंकाळी बांदा येथिल संत सोहिरोबानाथ आंबिये मठात स्वागत करण्यात आले.    गोव्यातून गुरुवार 15 जून रोजी आरंभ झालेली ही पायी वारी आषाढी एकादशीच्या आधी एक दिवस पंढरपुरात पोहोचणार आहे.या…

Read More

बांदा विठ्ठल मंदिरात २१ जुनपासून वीणा सप्ताह

⚡बांदा ता.१७-: बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हरिनाम वीणा सप्ताहाला बुधवार दि.21 जुन पासुन प्रारंभ होत आहे. या सप्ताहानिमित्त मंदिरात सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. 28 रोजी सप्ताहाची सांगता होणार असून गुरुवार दि.29 जुलै रोजी आषाढी एकादशीचा भव्य सोहळा होणार आहे. या वीणा सप्ताहाच्या नियोजनासाठीवीणा सप्ताह नियोजन…

Read More
You cannot copy content of this page