असलदेत वीज वितरणच्या तुटलेल्या तारेचा स्पर्श होऊन ५ शेळ्यांचा मृत्यू
⚡कणकवली ता.२८-: वीज वितरणच्या तुटलेल्या प्रवाहित तारेचा स्पर्श होऊन ५ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना कणकवली तालुक्यातील असलदे डामरेवाडीघडली.त्यामुळे शेतकऱ्याचे ४० हजारांचे नुकसान झाले आहे. असलदे डामरेवाडी येथील शेतकरी मितेश मंगेश डामरे यांच्या मालकीच्या ५ शेळ्या काल सायंकाळी ६ वाजता चरण्यासाठी सोडलेल्या असताना हा प्रकार घडला.त्यानंतर वीज वितरण कंपनीने अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत…
