⚡कणकवली ता.२८-: वीज वितरणच्या तुटलेल्या प्रवाहित तारेचा स्पर्श होऊन ५ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना कणकवली तालुक्यातील असलदे डामरेवाडी
घडली.त्यामुळे शेतकऱ्याचे ४० हजारांचे नुकसान झाले आहे.
असलदे डामरेवाडी येथील शेतकरी मितेश मंगेश डामरे यांच्या मालकीच्या ५ शेळ्या काल सायंकाळी ६ वाजता चरण्यासाठी सोडलेल्या असताना हा प्रकार घडला.त्यानंतर वीज वितरण कंपनीने अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.तसेच नुकसान भरपाईचे आश्वासन आहे. यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब,पोलीस पाटील सावित्री पाताडे,कोतवाल मिलिंद तांबे व ग्रामस्थ उपस्थित होते.
