‘वंदे भारत’मधील प्रवाशांचे
उमेश वाळके यांनी केले स्वागत

⚡कणकवली ता.२८-: कोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक व अद्ययावत असलेली वंदे भारत एक्स्प्रेस ही गाडी मंगळवारपासून धावू लागली आहे. बुधवारी सकाळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघालेली पहिलीच वंदे भारत एक्स्प्रेस गाडी प्रवाशांना घेऊन दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कणकवली रेल्वे स्थानकात दाखल झाली.

या गाडीचे चालक व प्रवाशांचे कोकण मेवा स्टॉलतर्फे माजी नगरसेवक उमेश वाळके यांनी स्वागत केले. यावेळी सोहम वाळके, ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संतोष चव्हाण, किशोर सोगम हे उपस्थित होते. विशेष म्हणजे माजी आमदार परशुराम उपरकर हे देखील या गाडीचे पहिले प्रवासी होते. त्यांचे देखील स्वागत करण्यात आले.

You cannot copy content of this page