‘ट्विंकल’च्या विद्यार्थ्यांनी घडविले वारीचे दर्शन

सोहम वाळके यानी केला उपक्रमाचा शुभारंभ; वेशभूषा ठरली लक्षवेधी

⚡कणकवली ता.२८-: आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला ट्विंकल स्टार प्ले स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या वारकर्‍यांची वेशभूषा करून वारीचे दर्शन घडवले. मुलांनी केलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली.


ट्विंकल स्टार प्ले स्कूलच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचे व सण आणि उत्सवांचे महत्व काळावे हा त्यामागील उद्देश आहे. आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूराला विठ्ठूरायाचे दर्शन घेण्यासाठी जातात. आषाढी एकादशीनिमित्त संतांच्या पालख्या विठूरायाची भेट घेण्यासाठी जातात. या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होता. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला ट्विंकल स्टार प्ले स्कूलच्या विद्यार्थ्यांना वारकर्‍यांची वेशभूषा करीत वारीचे दर्शन घडविले. शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माजी विद्यार्थी सोहम वाळके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ट्विंकल स्टार प्ले स्कुलच्या शिक्षिका अंजली आजगावकर, विशाखा ठाकूर, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. ट्विंकल स्टार प्ले स्कुलच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध उपक्रम राबविले जातात.आपल्या हिंदू धर्मातील सणांची माहिती व महत्व समजावे संस्कृतीचे जतन व्हावे. मुलांमध्ये शिक्षणा बरोबरच धार्मिक गोष्टीची आवड निर्माण व्हावी. या उद्देशाने असे नाविन्य पूर्ण उपक्रम राबविले जातात, असल्याचे असे स्कुलच्या संचालिका सुनिता कदम यांनी सांगितले .

You cannot copy content of this page