कार्यकारी अभियंता आवटी यांचे संजय पडते यांना आश्वासन
⚡कुडाळ ता.२८-: कुडाळ तालुक्यात जि. प. बांधकाम विभागात शाखा अभियंता नसल्याने अंदाजपत्रके उपलब्ध होत नसून विकास कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे शाखा अभियंता देण्यात यावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केली. याबाबत कुडाळ जि. प. बांधकाम विभागात येत्या दोन दिवसांत शाखा अभियंता देण्याचे आश्वासन जि. प. कार्यकारी अभियंता अनिल आवटी यांनी दिले.
तसेच नेरुर जि. प. मतदारसंघातील रस्त्यांची कामे पावसाळ्यात न करता पावसाळा संपला की पूर्ण करा अशी मागणी शिवसेना नेरुर जि. प. मतदारसंघाचे विभागप्रमुख शेखर गावडे यांनी केली. तसेच जि. प. बांधकाम उपविभागाकडून अंदाजपत्रके वेळीच उपलब्ध व्हावी अशी मागणी शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, नेरूर शिवसेना विभागप्रमुख शेखर गावडे, शिवसेनेचे अतुल बंगे, माजी जि. प. सदस्य राजू कविटकर, हळदीचे नेरूर सरपंच अजित परब व इतर उपस्थित होते.
