आंबोली पर्यटन स्थळांवर सौर ऊर्जेवरील सीसीटीव्ही कॅमेरे बसवा

आंबोली ग्रामस्थांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

आंबोली,ता.२८: येथील पर्यटन स्थळावर तसेच घाटात संवेदनशील ठिकाणी अनुचित प्रकार रोखण्यासाठी सौर उर्जेवरचे सीसीटीव्ही कॅमेरा बसवावेत अशी मागणी आंबोली ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

याबाबतचे निवेदन आंबोली पोलिसांकडे देण्यात आले आहे. येथील घाटात संवेदनशील ठिकाण दरडीपासून १०० मीटर अंतरावर रात्रीचे कोणी थांबू नये यासाठी फलक लावावा तसेच संवेदनशील ठिकाणी कॅमेरा ची निगराणी असावी. महादेवगड रस्त्यावर पोलिसांचे नियंत्रण असावे.तसेच पर्यटनाच्या दृष्टीने गस्त असावी.अशा मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक याना देण्यासाठी आंबोली पोलीस नाईक दीपक शिंदे,मनीष शिंदे यांच्याकडे देण्यात आले.हे निवेदन सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण,उद्धव ठाकरे गटाचे विभागाध्यक्ष बबन गावडे,उत्तम पारधी,पत्रकार विजय राऊत, प्रवीण राऊत, उदय आंबोलकर,प्रथमेश गवंडे,काशीराम राऊत,सुनील राऊत, प्रफुल्ल गावडे,अनिल गावडे,रमेश मोहिते,सुशील तावडे,महेश कोकरे,अजय मसुरकर,सचिन नार्वेकर,काका कोरगावकर,विजय राऊत यांनी निवेदन दिले. यावेळी पोलीस नाईक दीपक शिंदे म्हणाले,सूचना फलक तयार करून आणण्यात आले आहेत लवकरच सगळीकडे बसवण्यात येतील,शनिवार पासून आंबोलीत पोलिसांचा बंदोबस्त वाढणार आहे.आंबोली कॅमेरा च्या निगराणी खाली आणण्याचे प्रयत्न आहेत. पर्यटकांनी सूचना पाळून पर्यटन स्थळी आनंद लुटावा.

You cannot copy content of this page