कणकवलीत नंबर प्लेटवरून रंगली निवडणूक चर्चा !
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सध्या रंगली आहे.एकीकडे भाजपा, तर दुसरीकडे शहर विकास आघाडी आणि त्यांच्या पाठिशी शिंदे गट असल्याने राजकारणात खरी रंगत आली आहे. कारण भाजपसोबत नितेश राणे आणि शहर विकास आघाडीसोबत निलेश राणे म्हणून दोन्ही राणेबंधू कणकवलीत आमने-सामने राजकीय रंगमंचावर उभे आहेत. यात सोशल मीडियावर तर वेगवेगळ्या पोस्ट, फोटो, प्रचाराचे प्रयोग सुरू…
