Headlines

एसटीच्या वेळेत बदल करुन सोनुर्लीतील विद्यार्थ्यांची पायपीठ थांबवा…

उपसरपंच भरत गावकर यांची एसटी प्रशासनाकडे मागणी; अन्यथा ठिय्या आंदोलन.. ⚡सावंतवाडी ता.०१-: सोनुर्ली गावात सोडण्यात येणाऱ्या सव्वा अकराच्या बसच्या वेळेत बदल करुन कॉलेज विद्यार्थाची होणारी पायपीट थांबवा अन्यथा विद्यार्थाना घेऊनच स्थानकात ठिय्या आंदोलन छेडू असा इशारा सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांनी सावंतवाडी बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक श्री शेवाळे यांना दिला. याबाबतचे निवेदनही त्यांनी सादर केले….

Read More

आयशर टेम्पोला आग लागून नुकसान…

वेंगुर्ले येथील घटना: शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचा संशय.. ⚡वेंगुर्ले ता.०१-: वेंगुर्ला भटवाडी येथे आडीपूल जवळ मेघा पाटकर यांच्या घरासमोरील जागेत उभा असलेल्या आयशर टेम्पोला आज पहाटे अचानक आग लागली. या आगीत टेम्पोचे नुकसान झाले. मात्र स्थानिकांसह वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अग्निशमन बंब यांनी वेळीच आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचा संशय व्यक्त होत आहे….

Read More

सरपंच गुणाजी गावडे यांच्याकडून वेत्ये अंगणवाडी मुलांना गणवेश वाटप…

उद्धव ठाकरे वाढदिवसाचे औचित्य;अंगणवाडी सेविकेच्या मागणीचे दखल ⚡सावंतवाडी ता.०१-: शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून वेत्ये अंगणवाडी येथे मुलांना आज सरपंच गुणाजी गावडे यांनी स्वखर्चातून गणवेश वाटप केले. दरम्यान अंगणवाडी सेविका यांची मागणी लक्षात घेता तसेच गावातील लहान मुलांचे मनोबल वाढवून जास्तीत जास्त मुले अंगणवाडी मध्ये प्रवेश घ्यावा यासाठी सरपंच…

Read More

गांधी चौकात संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी

“त्या” वक्तव्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसने केला निषेध.. ⚡सावंतवाडी ता.०१-: संभाजी भिडे यांच्या वक्तव्य विरोधात राज्यभरातून संतापाची लाट दिसून येत आहे. सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने गांधी चौकात राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केली. संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात परंतु यावेळी महात्मा गांधी यांच्या वरील विधानावरून मंगळवारी…

Read More

मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी.

⚡सावंतवाडी ता.०१-: मिलाग्रीस हायस्कूल,या प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली.प्रथम शाळेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर प्रशालेची विद्यार्थ्यांनी कु.वेदांगी पटवर्धन हिने आपल्या सुंदर मनोगतातून टिळकांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती सर्व मुलांना दिली. या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका…

Read More

बबन साळगावकर यांच्या मोठ्या बंधूचे निधन

⚡सावंतवाडी ता.०१-: बाळा साळगावकर यांचे काल रात्री एक वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते 65 वर्षाचे होते. माजी नगराध्यक्ष बबन साळवकर यांचे ते मोठे बंधू होत. त्यांच्यावर आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, असा परिवार आहे.

Read More

आंबोली जंगलात बॉम्ब बनविणे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक नंतर वनविभाग गप्प का

तात्काळ कारवाई करण्याची होती गरज:नागरिकांची नाराजी:दहशदवाद विरोधी पथक आणि सिंधुदुर्ग पोलीस लागलेत कामाला.. ⚡आंबोली, ता.०१ अनिल चव्हाण-: जागतिक दहशतवादी संघटना इसीस शी संबंधित ४ आरोपी दहशतवादी एटीएस ने पकडल्यानंतर त्यांच्या चौकशीत आंबोलीत जंगलात त्यांनी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक चाचणी घेतल्याची कबुली दिल्यानंतर त्यांनी गोपनियरीत्या जंगलातून साहित्य जप्त केले पाहणी केली अशी माहिती मिळते. सिंधुदुर्ग…

Read More

संभाजी चौकात संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी

त्या वक्तव्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसने केला निषेध वैभववाडी प्रतिनिधीसंभाजी भिडे यांच्या वक्त विरोधात राज्यभरातून संतापाची लाट दिसून येत आहे. वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने वैभववाडी संभाजी चौकात राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केली. संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात परंतु यावेळी महात्मा गांधी यांच्या वरील विधानावरून सोमवारी…

Read More

माजी मंत्री महादेव जानकर यांची प्रमोद रावराणे यांच्या घरी सदिच्छा भेट

वैभववाडी प्रतिनिधीराष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक ,राष्ट्रीय अध्यक्ष ,पशुसंवर्धन,दुग्ध, मत्सविकास खात्याचे माजी मंत्री,आमदार मा. महादेव जानकर यांनी सोमवारी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांच्या एडगांव येथील निवासस्थानी सदीच्छा भेट दिली .यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर चर्चा करत येथील दुर्गम भागांतील वाडीवस्ती वरील विशेषतः डोंगर दर्‍यात असलेल्या धनगर वस्तीतील समस्या जाणुन घेतल्या .यावेळी रस्ते , पाणि,…

Read More

ओरोस येथील तरुणीची गळफास लावून आत्महत्या

⚡ओरोस ता.३१-: ओरोस परिसरातील एका कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या पंचवीस वर्षे युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या बेडरूमचा दरवाजा तोडून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कोल्हटकर अधिक तपास करीत आहेत.

Read More
You cannot copy content of this page