संभाजी चौकात संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी

त्या वक्तव्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसने केला निषेध

वैभववाडी प्रतिनिधी
संभाजी भिडे यांच्या वक्त विरोधात राज्यभरातून संतापाची लाट दिसून येत आहे. वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने वैभववाडी संभाजी चौकात राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केली.


संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात परंतु यावेळी महात्मा गांधी यांच्या वरील विधानावरून सोमवारी वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने वैभववाडी संभाजी चौक येथे संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
यावेळी तालुका अध्यक्ष दादामिया पाटणकर, जिल्हा कार्यकारीनी सचिव माजी सभापती मीनाताई बोडके, रोजगार व स्वयंरोजगार जिल्हा अध्यक्ष गुलजार काजी, उपाध्यक्ष नाटेकर, महिला अध्यक्ष प्रांजली जाधव, सामाजिक न्याय अध्यक्ष प्रकाश जाधव, सेवादल अध्यक्ष अशोक राणे, अमहमद बोबडे, वाशिम काजी, मुराद अली, मुस्ताकिन पाटणकर, दस्तगीर नाचरे, अशोक कांबळे आदी काॅग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page