मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी.

⚡सावंतवाडी ता.०१-: मिलाग्रीस हायस्कूल,या प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली.प्रथम शाळेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

त्यानंतर प्रशालेची विद्यार्थ्यांनी कु.वेदांगी पटवर्धन हिने आपल्या सुंदर मनोगतातून टिळकांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती सर्व मुलांना दिली. या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या शिक्षिका सौ.वर्षा राणे तर प्रशालेचे शिक्षक श्री जोशी सर यांनी आभार प्रदर्शन करुन कार्यक्रमाची सांगता केली.

You cannot copy content of this page