सरपंच गुणाजी गावडे यांच्याकडून वेत्ये अंगणवाडी मुलांना गणवेश वाटप…

उद्धव ठाकरे वाढदिवसाचे औचित्य;
अंगणवाडी सेविकेच्या मागणीचे दखल

⚡सावंतवाडी ता.०१-: शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून वेत्ये अंगणवाडी येथे मुलांना आज सरपंच गुणाजी गावडे यांनी स्वखर्चातून गणवेश वाटप केले.

दरम्यान अंगणवाडी सेविका यांची मागणी लक्षात घेता तसेच गावातील लहान मुलांचे मनोबल वाढवून जास्तीत जास्त मुले अंगणवाडी मध्ये प्रवेश घ्यावा यासाठी सरपंच गुणाजी गावडे यांनी आज गणवेश वाटप केले.

यावेळी श्री शेखर खांबल, शाळा मुख्याध्यापक श्रीम गावित मॅडम तसेच गावातील मुलांचे पालक उपस्थितीत होते

You cannot copy content of this page