दोडामार्गमधील पुलांचे जोडरस्ते बनलेत धोकादायक..
वाहनचालकांना करावा लागतोय खड्ड्यातून प्रवास ⚡दोडामार्ग,ता.०९-:तालुक्यात अनेक ठिकाणी नदी , ओहोळावर नवीन पूल बांधले गेले;मात्र पुलांच्या जोडस्त्यांकडे ठेकेदार व बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने वाहनचालकांना पावसाळ्यात जोडरस्त्यातील खड्ड्यातून प्रवास करावा लागतो आहे.एखाद दुसऱ्या पावसात वाहने जाऊन जोडरस्ते बऱ्यापैकी दबायला हवेत मग खडीकरण डांबरीकरण योग्य रीतीने करता येते अशी मखलाशी ठेकेदार व बांधकामचे अधिकारी नक्की करतील;पण त्याआधी…
