कलमठ ग्रा.पं.तर्फे महिलांना कापडी, कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण

कलमठ ग्रामपंचायतच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा धडाका

⚡कणकवली ता.०९-:
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्लास्टिक मुक्ती जनजागृती व महिलास्नेही गाव म्हणून गावातील महिलांना रोजगार संधी म्हणून कलमठ ग्रामपंचायतने कागदी व कापडी पिशव्या बनवण्याच्या 3 दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ग्रामपंचायतच्या श्री देव काशीकलेश्वर सभागृहामध्ये आयोजित केले आहे.


या प्रशिक्षण वर्गाला चांगला प्रतिसाद लाभला यावेळी गावातील 50 महिलांनि नोंदणी करून लाभ घेतला सावली शिक्षण संस्था वरवडेच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील नाडकर्णी यांच्या हस्ते उदघाटन झाले, यावेळी बोलताना सुनील नाडकर्णी यांनी ग्रामपंचायतच्या सातत्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करून महिला सक्षमीकरण साठी ग्रामपंचायतने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे म्हणाले. कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी उपस्थितांचे स्वागत येवेळी केले. यावेळी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर ,ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर ,ग्रामपंचायत सदस्य स्वाती नारकर ,सुप्रिया मेस्त्री ,हेलन कांबळे ,सचिन खोचरे ,तन्वीर शिरगावकर , सोनल लोकरे ,समीक्षा चिंदरकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page