Headlines

भाज्या धान्य यांचा वापर आहारात केल्यास शरीर निरोगी आणि सुदृढ होईल…

कमलाकर ठाकूर:तृणधान्य खाद्यपदार्थ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡सावंतवाडी ता.०३-: तृणधान्य पौष्टिकता जागरूकता पालकांबरोबर मुलांपर्यंत यावी तसेच निसर्गाने दिलेल्या भाज्या धान्य यांचा वापर आहारात केल्यास शरीर निरोगी आणि सुदृढ होईल असा विश्वास केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर यांनी व्यक्त केला ते सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन मध्ये आयोजित केंद्रस्तरीय शाळांच्या तृणधान्य खाद्यपदार्थ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत…

Read More

मराठा आंदोलकांवरील लाठी हल्ला सरकारपूरस्कृत या सरकारला जनता माफ करणार नाही…

आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर :राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा ⚡कणकवली ता.०३-: जालना येथे संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाज बांधवांवर मराठा विरोधी महायुती सरकार आणि भाजपा गृहमंत्र्यांचा आदेशानुसार पोलिसांनी अत्यंत अमानुषपणे लाठीहल्ला केला. या हल्ल्यात अनेक महिला, वृद्ध जखमी झाले. पुरोगामी महाराष्ट्रात सत्तेची धुंदी इथली जनता अजिबात सहन करणार नाही असे सांगत आम…

Read More

श्री स्वामी समर्थ मठ कळसुली हर्डी येथे ७‌ सप्टेंबरला दहिहंडी उत्सव

प्रेमदया प्रतिष्ठान व श्री स्वामी समर्थ मठ कळसुली यांचे आयोजन.. ⚡कणकवली ता.०३-: प्रेमदया प्रतिष्ठान, (रजि.) मुंबई आणि श्री स्वामी समर्थ मठ (रजि.) कळसुली श्री.हनुमंत सावंत कळसुली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार ७ सप्टेंबर रोजी भव्य दहीहंडी उत्सव कणकवली तालुक्यातील श्री.स्वामी समर्थ मठ कळसुली हर्डी येथे आयोजित करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकण विभातील ग्रामीण भागातील…

Read More

पिंगुळीमधील अवैध दारू विक्री प्रकरणी आणखी दोघांना अटक…

कुडाळ पोलिसांची कारवाई:दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी. ⚡कुडाळ ता.०२-: पिंगुळी नवीवाडी येथे पोलिसांच्या छाप्यात सुमारे २ लाख ६६ हजार ६४६ रुपयांची दारू सापडली होती. दरम्यान छाप्यात सापडलेल्या संदिप गावडे व उत्तम गावडे यांनी ही दारू कुडाळ बाजारपेठ येथील सिद्धेश शिरसाट व तेर्सेबांबर्डे येथील साईनाथ उर्फ रोशन पवार पुरवठा करत असल्याचे सांगितल्यावरून या दोघांनाही कुडाळ पोलिसांनी…

Read More

मालवण तहसीलदार वर्षा झालटे ऍक्शन मोडवर…

वाळू माफिया रडारवर:होड्या जाळल्या;वाळू माफियांचे धाबे दणाणले.. मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यात कालावल, कर्ली खाडीपात्रात वाळू माफीयांकडून होत असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतुकीला चाप लावण्याच्या दृष्टीने मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे या गेले चार पाच दिवस ऍक्शन मोडवर आल्या असून तहसीलदार वर्षा झालटे यांनी सुरु केलेल्या धडक कारवाई मुळे वाळू माफीयांचे धाबे दणाणले आहेत. गुरुवारी…

Read More

जिल्हा काँग्रेस पदाधिकारी ”इंडिया” या गटबंधन दौऱ्यात सहभागी

⚡सावंतवाडी ता.०२-: “इंडिया” या गटबंधन दौऱ्यासाठी आलेल्या राष्ट्रीय काँग्रेसची माजी अध्यक्ष व लाडके नेते राहुलजी गांधी* यांनी टिळक भवन येथे भेट दिली असता त्यांचा ‘सन्मान नीडर योद्धाचा* म्हणून महाराष्ट्र प्रदेश प्रदेश काँग्रेस अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले . यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वार रूमचे सुद्धा उद्घाटन करण्यात आले तदनंतर राहुलजींचे भाषण…

Read More

बांदा पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

⚡बांदा ता.०२-: सध्या देशात व राज्यात असलेल्या जनविरोधी सत्ताधाऱ्यांपासून जनतेला मुक्त करण्यासाठी INDIA च्या रूपाने देशव्यापी आघाडी तयार होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे सक्रिय मार्गदर्शन यासाठी लाभत आहे. त्यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास ठेवत राज्यातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत असं मत कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब…

Read More

कराटे स्पर्धेत वैभव गवसचे यश

सुवर्णपदक पटकावले;अखिल भारतीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा.. ⚡दोडामार्ग,ता.०२-:हिरो सुमन तलवार कप २०२३ अखिल भारतीय कराटे चॅम्पियनशिप मध्ये तेरवण मेढे येथील वैभव प्रवीण गवस तेरवणमेढे याने सुवर्णपदक पटकावले.स्पर्धा मुलुंड मुंबई येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात झाल्या.वैभव क्रीडा क्षेत्राप्रमाणे संगीत क्षेत्रातही चांगली कामागिरी करत आहे.त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्टारातून कौतुक होत आहे.

Read More

जालना घटनेचा कुडाळ तालुका काँग्रेसकडून निषेध…

⚡कुडाळ ता.०२-:कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसकडून जालना येथे न्याय हक्कांसाठी उपोषणकर्त्या मराठा समाज आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेचा आज कुडाळ गांधी चौक येथे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिंदे – फडणवीस- पवार महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, माजी नगराध्यक्षा आफरीन करोल, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, अल्पसंख्याक कुडाळ…

Read More

मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध…

हरी खोबरेकर:सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आदेशामुळेच हा लाठीचार्ज करण्यात आल्याचा केला आरोप… मालवण (प्रतिनिधी) जालना येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये वृद्ध महिलांसह अन्य आंदोलनकर्ते जखमी झाले. पोलिसांकडून झालेल्या या अमानुष लाठीचार्जचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून जाहीर निषेध केला आहे. जालना येथे मराठा समाजाच्या…

Read More
You cannot copy content of this page