पिंगुळीमधील अवैध दारू विक्री प्रकरणी आणखी दोघांना अटक…

कुडाळ पोलिसांची कारवाई:दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी.

⚡कुडाळ ता.०२-: पिंगुळी नवीवाडी येथे पोलिसांच्या छाप्यात सुमारे २ लाख ६६ हजार ६४६ रुपयांची दारू सापडली होती. दरम्यान छाप्यात सापडलेल्या संदिप गावडे व उत्तम गावडे यांनी ही दारू कुडाळ बाजारपेठ येथील सिद्धेश शिरसाट व तेर्सेबांबर्डे येथील साईनाथ उर्फ रोशन पवार पुरवठा करत असल्याचे सांगितल्यावरून या दोघांनाही कुडाळ पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी त्यांना कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.
   कुडाळ व बांदा पोलीस यांनी संयुक्तरीत्या पिंगुळी नवीवाडी येथे छापा टाकून सुमारे २ लाख ६६ हजार ६४६ रुपयांची अवैद्य गोवा बनावटीची दारू सापडली होती. याप्रकरणी संदीप गावडे व उत्तम गावडे यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. या पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीची दारू कोण पुरवठा करतो याचा तपास केला होता आणि या तपासामध्ये दोघांनीही गोवा बनावटीची दारू पुरवठा करणाऱ्यांची नावे सांगितली होती. त्यानुसार कुडाळ पोलिसांनी कुडाळ बाजारपेठ येथील सिद्धेश शिरसाट व तेर्सेबांबर्डे येथील साईनाथ पवार यांना पकडून अटक करून कुडाळ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला करीत आहेत.

You cannot copy content of this page