मालवण तहसीलदार वर्षा झालटे ऍक्शन मोडवर…

वाळू माफिया रडारवर:होड्या जाळल्या;वाळू माफियांचे धाबे दणाणले..

मालवण दि प्रतिनिधी

मालवण तालुक्यात कालावल, कर्ली खाडीपात्रात वाळू माफीयांकडून होत असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतुकीला चाप लावण्याच्या दृष्टीने मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे या गेले चार पाच दिवस ऍक्शन मोडवर आल्या असून तहसीलदार वर्षा झालटे यांनी सुरु केलेल्या धडक कारवाई मुळे वाळू माफीयांचे धाबे दणाणले आहेत. गुरुवारी मध्यरात्री कालावल खाडीपात्रातील एका होडीसह नऊ परप्रांतीय कामगारांवर कारवाईचा बडगा उचलल्यानंतर आज भल्या पहाटे बांदिवडे सय्यद जुवा खाडीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या चार नौका पकडून आग लावत त्या पेटवून देण्यात आल्याने कालावलसह कर्ली खाडीपात्रात बेकायदेशीर वाळू उठखंनं करणाऱ्यांना महसूलच्या या कारवाईने धडकी भरली आहे.

दरम्यान महसूलच्या या कारवाईमुळे परप्रांतीयांनी माहिती मिळताच पळ काढला आहे. याबाबत बोलताना तहसीलदार वर्षा झालटे यांनी यापुढे बेकायदेशीर वाळू उतखनान करण्यासाठी आलेल्या परप्रांतीयांवर कारवाई करण्यात येईल व महसूलची कारवाईची पथके तयारीत ठेवण्यात आल्याने कारवाई ही सुरूच राहील असे सांगितले.

या संबंधिचे अधिक वृत्त असे की, सध्या मालवण तालुक्यातील कालावल आणि कर्ली खाडीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशील वाळू उत्खनन सुरु असून उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. विशेषतः बेकायदेशीररित्या उत्खनन केलेली वाळू ही गोव्याला जात असल्याने आणि गोव्यात या वाळूला सोन्याचा दर मिळत असल्याने वाळू माफीयांनी बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. वाळू माफीयांनी सुरु केलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननामुळे संतप्त झालेल्या वर्षा झालटे या ऍक्शन मोडवर आल्या असून त्यांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी होडीसह नऊ परप्रांतीय कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा तहसीलदार झालटे यांनी आज भल्या पहाटे बांदिवडे सय्यद जुवा खाडीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या चार नौका पकडल्या व नौकेतील साहित्याला आग लावून पेटवून दिल्या. बांदिवडे सय्यद जुवा खाडीपात्रा लगत चार नौका वाळू उठखंना करण्याच्या उद्देशाने उभ्या असलेल्या महसूलच्या पथकाला आढळून आल्या तर परप्रांतीय कामगारही नौकांच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले होते. कारवाईसाठी महसूल विभागाचे पथक आल्याचे समजता परप्रांतीय कामगारांनी होड्या तिथेच टाकून पळ काढला त्यामुळे वाळू उतखन करण्यासाठी असलेल्या होडीतील साहित्याची आणि नौका यांना आग लावत त्या पेटवून दिल्या. ही कारवाई तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, हडी तलाठी व्ही. एम. राठोड, तलाठी रवी शेजवळ, तलाठी जाधव, यांच्या मार्फत केली गेली.

You cannot copy content of this page